Pocso act 2012 कलम ३१ : विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ लागू असणे : 

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ३१ :
विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ लागू असणे : 
या अधिनियमात अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या तरतुदी (जामीन व बंधपत्रे याविषयीच्या तरतुदींसह) विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला लागू असतील आणि उक्त तरतुदींच्या प्रयोजनार्थ, विशेष न्यायालय हे सत्र न्यायालय असल्याचे मानण्यात येईल व विशेष न्यायालयासमोर खटला चालविणारी व्यक्ती ही सरकारी अभियोक्ता असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply