लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २७ :
बालकाची वैद्यकीय तपासणी :
१) ज्याच्यासंबंधात या अधिनियमाखालील कोणताही अपराध करण्यात आला असेल त्या बालकाची वैद्यकीय तपासणी ही या अधिनियमान्वये अपराधांबद्दल प्रथम माहिती अहवालाची किंवा तक्रारीची नोंद करण्यात आली नसली तरी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या कलम १६४ अ अनुसार करण्यात येईल.
२) बळी पडलेली व्यक्ती ही बालिका असेल, तर वैद्यकीय तपासणी ही महिला डॉक्टरकडून करण्यात येईल.
३) वैद्यकीय तपासणी ही बालकाच्या आई-वडिलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा इतर कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत करण्यात येईल.
४) पोटकलम ३) मध्ये निर्देश केलेले बालकाचे आई-वडील किंवा इतर व्यक्ती कोणत्याही कारणामुळे बालकाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान उपस्थित राहू शकत नसतील तेथे, वैद्यकीय तपासणी ही वैद्यकीय संस्थेच्या प्रमुखाने नामनिर्देशित केलेल्या महिलेच्या उपस्थितीत करण्यात येईल.