Pocso act 2012 कलम २५ : दंडाधिकाऱ्याद्वारे बालकाचा जबाब नोंदवून घेणे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २५ :
दंडाधिकाऱ्याद्वारे बालकाचा जबाब नोंदवून घेणे :
१) जर बालकाचा जबाब, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) (यापुढे याचा निर्देश संहिता असा करण्यात येईल) याच्या कलम १६४ अन्वये नोंदवून घेण्यात येत असेल तर दंडाधिकारी असा जबाब नोंदवून घेताना त्यात काहीही अंतर्भूत असले तरी बालकाने सांगितल्याप्रमाणे जबाबाची नोंद घेण्यात येईल.
परंतु असे की, कलम १६४ पोटकलम १) च्या पहिल्या परंतुकातील तरतुदी त्या जितपत आरोपीच्या वकिलाला उपस्थित राहण्यास परवानगी देणाऱ्या असतील तितपत, याबाबतीत लागू असणार नाहीत.
२) दंडाधिकारी, संहितेच्या कलम १७३ अन्वये अंतिम अहवाल दाखल केल्यावर संहितेच्या कलम २०७ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दस्तऐवजांच्या प्रती त्या बालकाला व त्याच्या आई-वडिलांना किंवा त्याच्या प्रतिनिधीला पुरवील.

Leave a Reply