Pocso act 2012 कलम २२ : खोटी तक्रार किंवा खोटी माहिती यांबद्दल शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २२ :
खोटी तक्रार किंवा खोटी माहिती यांबद्दल शिक्षा :
१) जी व्यक्ती केवळ एखाद्या व्यक्तीचा पाणउतारा करण्याच्या तिच्याकडून खंडणी उकळण्याच्या किंवा तिला धमकावण्याच्या किंवा तिची मानहानी करण्याच्या हेतूने कलमे ३, ५, ७ आणि कलम ९ खालील अपराध केल्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीविरूद्ध खोटी तक्रार करील किंवा खोटी माहिती पुरवील अशी कोणतीही व्यक्ती, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या करावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्हीही शिक्षांस पात्र असेल.
२) एखाद्या बालकाने खोटी तक्रार केली असेल किंवा खोटी माहिती पुरविलेली असेल तेथे अशा बालकाला कोणतीही शिक्षा होणार नाही.
३) बालक नसेल असा जो कोणी तक्रार किंवा माहिती खोटी असल्याचे माहीत असूनदेखील एखाद्या बालकाविरूद्ध खोटी तक्रार करून किंवा खोटी माहिती पुरवून त्याद्वारे या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधांमध्ये अशा बालकाल बळी पाडत असेल तरी ती व्यक्ती एका वर्षापर्यंत असू शकेल इतक्या करावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्हीही शिक्षास पात्र असेल.

Leave a Reply