लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २१ :
माहिती कळविण्यात किंवा प्रकरणाची नोंद करण्यात कसून केल्याबद्दल शिक्षा :
१) जी व्यक्ती कलम १९ चे पोटकलम १) किंवा कलम २० अन्वये, अपराध करण्यात आल्याचे कळविण्यात कसून करील किंवा जी कलम १९ चे पोटकलम २) अन्वये आा अपराधाची नोंद करण्यात कसूर करील अशी कोणतीही व्यक्ती, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.
२) कोणत्याही कंपनीची किंवा संस्थेची (मग ती कोणत्याही नावाने संबोधली जावो) प्रभारी असलेली कोणतीही व्यक्ती त्याच्या नियंत्रणाखालील दुय्यम कर्मचाऱ्याच्या संबंधातील कोणताही अपराध करण्यात आल्याची माहिती कलम १९ च्या पोटकलम १) अन्वये कळविण्यात कसूर करील तर, ती, एका वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या करावासाच्या आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
३) पोटकलम १) च्या तरतुदी, या अधिनियमान्वये, एखाद्या बालकाला लागू होणार नाहीत.