Pocso act 2012 कलम १६ : अपराधास अपप्रेरणा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
प्रकरण ४ :
अपराध करण्यास अपप्रेरणा व अपराध करण्याचा प्रयत्न करणे :
कलम १६ :
अपराधास अपप्रेरणा :
जेव्हा एखादी व्यक्ती
पहिल्यांदा तो अपराध करण्यास कोणत्याही व्यक्तीस चिथांवणी देते किंवा
दुसऱ्यांदा अन्य एका किंवा अधिक व्यक्तींबरोबर तो अपराध करण्याच्या कोणत्याही कटात सामील होते, त्या कटाला अनुसरून आणि तो अपराध केला जाण्यासाठी एखादी कृती किंवा अवैध अकृती घडून येते तेव्हा किंवा
तिसऱ्यांदा तो अपराध करण्याच्या कामी कोणत्याही कृतीद्वारे किंवा अवैध अकृतीद्वारे उद्देशपूर्वक सहाय्य करते तेव्हा तिने तो अपराध करण्यास अपप्रेरणा दिली असे होते.
स्पष्टीकरण एक :
जी व्यक्ती, एखादे महत्त्वाचे तथ्य प्रकट करण्यास ती बद्ध असताना त्याबाबत बुद्धिपुरस्पर अपवेदन करून अथवा ते बुद्धिपुरस्पर लपवून इच्छापूर्वक एखादा अपराध करते किंवा घडवून आणते अथवा करवण्याचा किंवा घडवून आणण्याचा प्रयत्न करते, तिने तो अपराध करण्यास चिथावणी दिली असे होते.
स्पष्टीकरण दोन :
जो कोणी, एखादी कृती करण्यापूर्वी किंवा करतेवेळी, ती करणे सुकर व्हावे यासाठी एखादा अपराध करतो आणि त्याद्वारे ती कृती करणे सुकर करतो, तो, ती कृती करण्याच्या कामी सहाय्य करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण तीन :
जो कोणी, या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या प्रयोजनासाठी, धमकी किंवा बळाचा वापर करून किंवा जबरदस्ती, अपहरण, लबाडी, फसवणूक, अधिकाराचा किंवा पदाचा दुरूपयोग, दुबळेपणा किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण असलेल्या व्यक्तीची संमती घेण्यासाठी पैसे किंवा लाभ देणे किंवा घेणे या अन्य प्रकाराने बालकाला नोकरी, निवारा देत असेल, त्याला स्वीकृत करीत असेल किंवा त्याला घेऊन जात असेल तो, ती कृती करण्यास मदत करतो असे म्हटले जाते.

Leave a Reply