लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम १५ :
१.(बालकाचा अंतर्भाव असलेल्या संभोगवर्णनपर साहित्याचा संग्रह करण्याबद्दल शिक्षा :
१) कोणतीही व्यक्ती, जी बालकाचा अंतर्भाव असलेले संभोगवर्णनपर साहित्य सामायिक करण्याच्या किंवा त्यास प्रसारित करण्याच्या उद्देशाने एखादे बालक सम्मिलित असलेली संभोगवर्णनपर साहित्या कोणत्याही रुपात संग्रही करते किवा जवळ बाळगते, परंतु ते मिटविणे किंवा नष्ट करण्यास किंवा विहित अधिकाऱ्याकडे सोपविण्यात(रिपोर्ट करण्यास) असफल होते, त्यास पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसेल आणि दुसऱ्या किंवा पश्चात्वर्ती अपराधास दहा हजार रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
२) कोणतीही व्यक्ती, जी बालकाचा अंतर्भाव असलेली संभोगवर्णनपर साहित्याचे रिपोर्टिंग या प्रयोजना शिवाय, विहित केल्याप्रमाणे, कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रकारे प्रसारीत किंवा प्रदर्शित किंवा प्रचारित किंवा वितरीत करील किंवा न्यायालयात त्याचा साक्ष (पुरावा) म्हणून उपयोग करील, ती तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.
३) कोणतीही व्यक्ती, बालकाचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही संभोगवर्णनपर व्यावसायिक प्रयोजनासाठी संग्रह करील ती पहिल्या दोषसिद्धि नंतर तीन वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु पाचवर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल आणि दुसऱ्या आणि पश्चात्वर्ती दोषसिद्धि नंतर पाच वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षांपर्यत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस व द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम २५ की कलम ८ अन्वये कलम १५ च्या ऐवजी समाविष्ट करण्यात आला.