राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१
कलम २ :
भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अवमान :
जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा भारताचे संविधान किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविछिन्न करील, विरूप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करील, नष्ट करील, पायांखाली तुडवील किंवा १.(अन्यथा त्याबद्दल अनादर दाखवील; किंवा त्याची बेअदबी करील) (मग तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे असो वा कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील
स्पष्टीकरण १ :
कायदेशीर मार्गाने भारताच्या संविधानात सुधारणा किंवा भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, संविधानाबाबत किंवा भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याचे किंवा त्यावर टिकाटिपणी करण्याचे या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही
२.(स्पष्टीकरण २ :
भारतीय राष्ट्रध्वज या शब्दप्रयोगात, कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे किंवा भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र किंवा इतर दृश्य प्रतिरूपण अंतर्भूत आहे
स्पष्टीकरण ३ :
सार्वजनिक ठिकाण या शब्दप्रयोगाचा अर्थ, जनतेने वापरावी म्हणून योजलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा, असा आहे व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनांचा अंतर्भाव आहे
स्पष्टीकरण ४ :
भारतीय राष्ट्रध्वजाचा अनादर करणे याचा अर्थ आणि यात, –
(a)क)(अ) भारतीय राष्ट्रध्वजाची अक्षम्य मानहानी करणे किंवा अप्रतिष्ठा करणे; किंवा
(b)ख)(ब) एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी भारतीय राष्ट्रध्वज खाली आणणे; किंवा
(c)ग) (क) शासनाने दिलेल्या निदेशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अध्र्यावर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज राष्ट्रध्वज अध्र्यावर उतरविणे; किंवा
(d)घ) (ड) राज्यतील अंत्यसंस्कार किंवा निमलष्करी दल किंवा अन्य सेनादलातील अंत्यसंस्कार याव्यतिरिक्त जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरूपात भारतीय राष्ट्रध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करणे; किंवा
(e)(ङ) ३.(इ) भारतीय राष्ट्रध्वजाचा,
(एक) कोणत्याही व्यक्तीच्या कमरेखाली घालण्याचा पोशाख, गणवेश, किंवा कोणत्याही वर्णनाची उपसाधने म्हणून; किंवा
(दोन) उशा, हातरूमाल, हात पुसणे, अंतर्वस्त्रे किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे,
यासाठी वापर करणे; किंवा)
(f)च)(फ) भारतीय राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिणे; किंवा
(g)छ)(ग) भारतीय राष्ट्रध्वजाचा प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन यांसह विशेष प्रसंग साजरे करण्याचा एक भाग म्हणून भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्याव्यतिरिक्त कोणतीही वस्तु घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करणे; किंवा
(h)ज)(ह) भारतीय राष्ट्रध्वजाचा पुतळा किंवा स्मारकशिल्प किंवा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादण्यासाठी वापर करणे; किंवा
(i)झ)(आय) भारतीय राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श करणे किंवा तो पाण्यावरून फरफटत नेणे; किंवा
(j)ञ)(जे) भारतीय राष्ट्रध्वज मोटारवाहन, रेल्वेगाडी, जहाज किंवा विमान किंवा कोणतीही इतर त्याच प्रकारची वाहने यांच्या छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादणे; किंवा
(k)ट)(के) भारतीय राष्ट्रध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करणे; किंवा
(l)ठ)(ल) भारतीय राष्ट्रध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावणे
यांचा समावेश होतो .)
———
१. २००३ चा अधिनियम क्रं. ३१ कलम २ अन्वये विवक्षित शब्दाऐवजी दाखल केले.
२. २००३ चा अधिनियम क्रं. ३१ कलम २ अन्वये जादा दाखल केले.
३. २००५ चा अधिनियम क्रं. ५१ कलम २ अन्वये विवक्षित शब्दाऐवजी दाखल केले.
