Peca कलम ५ : इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या साठवणुकीस मनाई (प्रतिबंध) :

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम ५ :
इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या साठवणुकीस मनाई (प्रतिबंध) :
या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेपासून कोणतीही व्यक्ती, जी कोणत्याही स्थानाची मालक किंवा अधिभोक्ता आहे किंवा त्यावर नियंत्रण ठेवते किंवा त्याचा उपयोग करते, तेथील इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या कोणत्याही साठ्याच्या साठवणुकीसाठी त्याचा वापर करण्यास जाणूनबुजून परवानगी देणार नाही :
परंतु अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेला इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या विक्री, वितरण, वाहतूक, निर्यात किंवा जाहिरातीसाठी ठेवलेला विद्यमान साठ्याची विल्हेवाट या पश्चात नमूद केलेल्या पद्धतीने लावली जाईल –
(a)क) अ) इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या विद्यमान साठ्याबद्दल स्थानाचा स्वामी किंवा अधिभोक्ता स्वेच्छेने अनावश्यक विलंब न करता त्याच्या ताब्यात असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या साठ्याची यादी तयार करेल आणि यादीत निर्दिष्ट साठा प्राधिकृत अधिकारीच्या जवळच्या कार्यालयात सादर करेल; आणि
(b)ख) ब) ज्या अधिकृत अधिकाऱ्याला खंड (क (अ)) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा कोणताही साठा पाठवला जातो तो त्या त्याकाळी अमलात असलेल कायद्यानुसार विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुलभ उपाययोजना करेल.

Leave a Reply