सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४
(१९८४ चा ३) (१५ जून १९९६ रोजी यथाविद्यमान)
प्रस्तावना :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्याशी निगडीत बाबींसाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या पस्तिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
————
(१) या अधिनियमास, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४ असे म्हणावे .
(२) त्याचा विस्तार जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरून संपूर्ण भारतभर आहे .
(३) तो दिनांक २८ जानेवारी १९८४ रोजी अमलात आला असल्याचे मानण्यात येईल.