नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ३:
धार्मिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, एखाद्या व्यक्तीला ;-
(a)(क)(अ) अशा व्यक्तीप्रमाणे तोच धर्म प्रतिज्ञापित करणाऱ्या १.(***) इतर व्यक्तींना किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही शाखेला जे कोणतेही सार्वजनिक उपासनास्थान खुले असेल त्यात प्रवेश करण्यास; अथवा
(b)(ख)(ब) अशा व्यक्तीप्रमाणे तोच धर्म प्रतिज्ञापित करणाऱ्या १.(***) इतर व्यक्तींना किंवा त्यांच्या कोणत्याही शाखेला एखाद्या सार्वजनिक उपासनास्थानी पूजा करण्याची किंवा प्रार्थना करण्याची किंवा कोणतेही धार्मिक कृत्य करण्याची अथवा कोणताही पवित्र तलाव, विहीर, झरा किंवा जलप्रवाह २.(किंवा नदी किंवा सरोवर यांमध्ये स्नान करण्याची किंवा त्याचे पाणी वापरऱ्याची अथवा असा तलाव; जलप्रवाह; नदी किंवा सरोवर यांच्या कोणत्याही घाटावर स्नान करण्याची) अशी मुभा असेल तशाच रीतीने व तेवढ्याच मर्यादेपर्यंत ते करण्यास,
प्रतिबंध करील तो, ३.(एक महिन्याहून कमी नाही व सहा महिन्यांहून जास्त नाही इतक्या मुदतीच्या कारावासास व द्रव्यदंडासही पात्र होईल आणि तो द्रव्यदंड शंभर रुपयांहून कमी व पाचशे रुपयांहून जास्त असणार नाही.)
स्पष्टीकरण :
या कलमाच्या व कलम४ च्या प्रयोजनार्थ, बौद्ध, शीख किंवा जैन धर्म प्रतिज्ञापिक करणाऱ्या व्यक्ती अथवा वीरशैव, लिंगायत, आदिवासी, तसेच ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज व स्वामिनारायण संप्रदाय यांचे अनुयायी यांसुद्धा, कोणत्याही रुपातील किंवा कोणत्याही विकासव्यवस्थेतील हिंदू धर्म प्रतिज्ञापित करणाऱ्या व्यक्ती, हिंदू असल्याचे मानण्यात येईल.
———
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ५ अन्वये (१९-११-१९७६ पासून) किंवा त्याच धार्मिक संप्रदायाच्या हे शब्द वगळले.
२. १९७६ चा अधिनियम क्रमाकं १०६ याच्या कलम ५ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ५ अन्वये मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.