Pcpndt act कलम ६ : गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ६ :
गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध :
या अधिनियमाच्या प्रारंभास व तेव्हापासून,-
(a)क) कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र किंवा आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय आपल्या केंद्रात, प्रयोगशाळेत किंवा चिकित्सालयात गर्भलिंग निर्धारण करण्याच्या प्रयोजनाकरिता स्वनातीत चित्रणासह प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्यास कारणीभूत होणार नाही.
(b)ख) कोणतीही व्यक्ती, गर्भलिंग निर्धारण करण्याच्या प्रयोजनासाठी स्वनातीत चित्रणासह कोणत्याही प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करणार नाही किंवा करण्यास कारणीभूत होणार नाही.
(c)१.(ग) कोणतीही व्यक्ती, येनकेन प्रकारे, गर्भधारणेपूर्वी किंवा नंतर लिंगाची निवड करणार नाही किंवा करण्यास मुभा देणार नाही.)
———–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ९ द्वारे समाविष्ट करण्यात आले. (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)

Leave a Reply