गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ५ :
गर्भवती महिलेची लेखी संमती व गर्भाचे लिंग कळविण्यास प्रतिबंध :
१) कलम ३ च्या खंड (२) मध्ये निर्दिष्ट केलेली कोणतीही व्यक्ती,-
(a)क) संबंधित गर्भवती महिलेस, आपल्याला ज्ञात असलेल्या सर्व बाबींचे व अशा पद्धतीच्या उत्तरीय परिणामांचे स्पष्टीकरण केल्याशिवाय ;
(b)ख) त्या महिलेकडून अशी पद्धती वापरण्याची लेखी संमती, तिला समजणाऱ्या भाषेत, विहित नमुन्यात प्राप्त केल्याशिवाय; आणि
(c)ग) खंड (ख) अन्वये प्राप्त केलेली गर्भवती महिलेच्या लेखी समंतीची प्रत तिला दिल्याशिवाय प्रसव-पूर्व निदान पद्धतीचा वापर करणार नाही.
१.(२) प्रसव-पूर्व रोगनिदान पद्धतीचे चालन करणाऱ्या व्यक्तीसह कोणतीही व्यक्ती, संबंधित गर्भवती महिलेस किंवा तिच्या नातोवाईकास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस अक्षर, खुणा यांद्वारे किंवा कोणत्याही इतर रीतीने, गर्भाचे लिंग कळविणार नाही.)
———–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ८ द्वारे पोट-कलम (२) ऐवजी हे पोटकलम दाखल करण्यात आले. (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)