गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३२ :
नियम करण्याचे अधिकार :
१) या अधिनियमांच्या तरतुदी पार पाडण्यासाठी केंद्र सरकारला नियम करता येतील.
२) विशेषकरुन आणि पूर्ववर्ती अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमांद्वारे पुढील गोष्टींची तरतूद करता येईल :-
१.(एक) कलम ३ च्या खंड (२) अन्वये नोंदणीकृत आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय येथे नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या किमा अर्हता;
एक -क) कलम ४ चे पोटकलम (३) परंतुकान्वये आपल्या चिकित्सालयामध्ये गरोदर महिलेवर स्वनातीत चित्रणाचा वापर करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने ज्या पद्धतीने त्यांचा अभिलेख ठेवला पाहिजे, ती पद्धत 😉
दोन) कलम ५ अन्वये गरोदर महिलेची संमती ज्या नमुन्यात घ्यावयाची आहे तो नमुना ;
तीन) कलम ८ च्या पोटकलम (४) अन्वये केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाच्या सदस्यांनी आपली कार्ये पार पाडताना अनुसरावयाची कार्यपद्धती ;
चार) कलम ९ च्या पोटकलम (५) अन्वये पदसिद्ध सदस्यांखेरीज अन्य सदस्यांना अनुज्ञेय असलेले भत्ते ;
२.(चार-क) केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाने कलम १६ च्या खंड (चार) अन्वये निर्धारित केलेली आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा अणि आनुवंशिकीय चिकित्सालये येथे कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी पालन करावयाची आचारसंहिता ;
चार-ख) या अधिनियमाच्या कलम १६-क, पोटकलम (१) च्या खंड (चार) अन्वये राज्यात हाती घेण्यात आलेल्या विभिन्न उपक्रमांच्या बाबतीत मंडळ आणि केंद्र सरकार यांच्याकडे राज्य किंवा संघ राज्यक्षेत्र पर्यवेक्षी मंडळे ज्या रीतीने अहवाल सादर करतील ती रीत ;
चार-ग) कलम १७-क च्या खंड (घ) अन्वये अन्य कोणत्याही बाबतीत समुचित प्राधिकाऱ्याला अधिकार प्रदान करणे 😉
पाच) कलम १७ च्या पोटकलम (८) याच्या परंतुकाअन्वये सल्लागार समितीच्या कोणत्याही दोन बैठकांदरम्यानचा कालावधी ;
सहा) ज्या अटी व शर्तींच्या अधीन राहून एखाद्या व्यक्तीची सल्लागार समितीवर नियुक्ती करता येईल त्या अटी व शर्ती आणि कलम १७ च्या पोटकलम (९) अन्वये, अशा समितीने अनुसरावयाची कार्यपद्धती ;
सात) ज्या नमुन्यात व ज्या रीतीने नोंदणीसाठी अर्ज करण्यात येईल तो नमुना व ती रीत आणि कलम १८ च्या पोटकलम (२) अन्वये त्यासाठी भरावयाची फी ;
आठ) कलम १८ च्या पोटकलम (५) अन्वये आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांनी पुरवावयाच्या सुविधा, ठेवावयाची साधनसामग्री व अन्य प्रमाणके ;
नऊ) कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये नोंदणी प्रमाणपत्र ज्या नमुन्यात देण्यात येईल तो नमुना ;
दहा) ज्या रीतीने आणि ज्या कालावधीनंतर, नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्यात येईल ती रीत आणि तो कालावधी, आणि नवीकरणासाठी कलम १९ च्या पोट-कलम (३) अन्वये अनुज्ञेय असेल ती फी ;
अकरा) कलम २१ अन्वये ज्या रीतीने अपील दाखल करण्यात येईल ती रीत;
बारा) कलम २९ च्या पोटकलम (१) अन्वये ज्या कालावधीपर्यंत अहवाल, तक्ते, इत्यादी जतन करण्यात येतील असा कालावधी ;
तेरा) कागदपत्रे, अभिलेख, वस्तू, इत्यादी, ज्या रीतीने जप्त करण्यात येतीनल ती रीत आणि अशा जप्त केलेल्या वस्तूंची यादी तयार करण्याची आणि अशी कागदपत्रे, अभिलेख आणि वस्तू कलम ३० च्या पोटकलम (१) अन्वये ज्या व्यक्तीच्या अभिरक्षेतून जप्त करण्यात आले होते, तिच्याकडे सुपूर्द करण्याची रीत;
चौदा) विहित करणे आवश्यक असणारी किंवा विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब.
———-
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम २४ द्वारे, खंड (एक) ऐवजी दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).
२. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम २४ द्वारे, हा मजकूर समाविष्ट करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).