Pcpndt act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
(सन १९९४ चा अधिनियम क्रमांक ५७) (२० सप्टेंबर १९९४)
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
१.(गर्भधारणा -पूर्व या गर्भधारणोत्तर लिंग निवडीस प्रतिबंध करण्यासाठी आणि आनुवंशिक अपसामान्यता किंवा चयापचय विकार गुणसूत्रीय अपसामान्यता किंवा विवक्षित जन्मजात अपरचना किंवा लिंग-सलग्न विकार शोधून काढण्याच्या प्रयोजनार्थ प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचे विनियमन करण्याकरिता आणि ज्याची परिणती स्त्रीगर्भहत्येमध्ये होते अशा रीतीने लिंग निर्धारण करण्याच्या प्रयोजनार्थ या तंत्रांचा दूरुपयोग करण्यास प्रतिबंध करण्याकरिता आणि तत्संबंधित वा तदानुषंगीक बाबींची तरतूद करण्याकरिता अधिनियम.)
भारतीय गणराज्याच्या पंचेचाळिसाव्या वर्षी संसदेद्वारे पुढील प्रमाणे अधिनियमित होवो :-
————–
१) या अधिनियमास २.(गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध)) अधिनियम, १९९४ असे म्हणावे.
२) तो, ३.(***) संपूर्ण भारतास लागू होईल.
३) तो, केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा ४.(दिनांकास) अंमलात येईल.
———–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम २ द्वारे दीर्घ शीर्षका एवजी हा मजकूर दाखल करण्यात आला ( १४ फे्रबु्रवारी २००३ रोजी व तेव्हापासून ).
२. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ३ द्वारे, प्रसव-पूर्व निदान तंत्र (विनियमन व गैरवापरास प्रतिबंध) या ऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला ( १४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ९५ आणि अनुसूची अन्वये जम्मू व काश्मीर राज्यखेरीज करुन हा मजकुर वगळण्यात आला. (३१-१०-२०१९ पासून)
४. दिनांक १ जानेवारी १९९६ रोजी अंमलात आला, पहा जी.एस.आर ७०६, दिनांक २० डिसेंबर १९९५, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग -दोन, कलम ३ (दोन), दिनांक २१ डिसेंबर १९९५ मध्ये प्रकाशित झाला.

Leave a Reply