गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १५ :
पुनर्नियुक्ती करण्याकरिता सदस्यांची पात्रता :
विहित केले असेल त्याप्रमाणे सेवांच्या इतर अटी व शर्तींच्या अधीन राहून, जिचे सदस्यत्व संपुष्टात आले असेल अशा कोणत्याही व्यक्तीला सदस्य म्हणून पुनर्नियुक्तीस पात्र ठरविण्यात येईल :
१.(परंतु असे की, पदसिद्ध सदस्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही सदस्याची लागोपाठ दोन पदावधींपेक्षा अधिक कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार नाही.)
———–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम १२ द्वारे, दाखल करण्यात आला( १४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून )