Pcpndt act कलम ११ : विशिष्ट प्रयोजनांकरिता मंडळामध्ये व्यक्तीचा तात्पुरता सहयोग :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ११ :
विशिष्ट प्रयोजनांकरिता मंडळामध्ये व्यक्तीचा तात्पुरता सहयोग :
१) मंडळास, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदी अंमलात आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे साहाय्य किंवा सल्ला घेण्याची इच्छा झाल्यास, विनियमांनुसार निर्धारित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा प्रयोजनाकरिता त्या व्यक्तीला सहयोगी करुन घेता येईल.
२) पोट-कलम (१) अन्वये मंडळाने कोणत्याही प्रयोजनाकरिता आपल्यात सहयोगी करुन घेतलेल्या व्यक्तीला त्या प्रयोजनाशी संबंधित असलेल्या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असेल, पण मंडळाच्या बैठकीत त्याला मतदानाचा हक्क असणार नाही आणि इतर कोणत्याही प्रयोजनाकरिता तो मंडळाचा सदस्य असणार नाही.

Leave a Reply