बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ७ :
कलम ४ किंवा कलम ५ अन्वये काढलेल्या आदेशांत फेरबदल करण्याचा जिल्हा न्यायालयाचा अधिकार :
जर अर्ज प्रलंबित असण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी आणि अर्ज अंतिम स्वरूपात निकालात काढल्यानंतर देखील परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला असेल तर, कलम ४ किंवा कलम ५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशात भर घालण्याचा, फेरबदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार जिल्हा न्यायालयास असेल.