बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ६ :
बालविवाहातून जन्मलेल्या बालकांचे औरसता :
कलम ३ अन्वये विलोपनाच्या हुकूमनाम्याद्वारे बालविवाह विलोपित करण्यात आला असला तरीही, हुकूमनामा देण्यापूर्वी, जन्मलेले किंवा गर्भात असलेले प्रत्येक बालक, मग ते या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर जन्मलेले असो, सर्व प्रयोजनांसाठी औरस बालक असल्याचे मानण्यात येईल.