भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ४ :
विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे :
१)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही इतर कायदा यामध्ये अंतर्भूत असले तरीही, कलम (३) च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधांबाबतचे खटले केवळ विशेष न्यायाधीशांकडून चालवण्यात येतील.
२)कलम (३) च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला प्रत्येक अपराध, असा अपराध ज्या क्षेत्रामध्ये घडला त्या क्षेत्रासाठी नेमलेल्या विशेष न्यायाधीशाद्वारे किंवा या प्रकरणासाठी नेमलेल्या विशेष न्यायाधीशाद्वारे किंवा अशा क्षेत्रासाठी एकापेक्षा अधिक विशेष न्यायाधीश नेमले असतील अशा बाबतीत, केंद्र शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात येईल अशा विशेष न्यायाधीशाकडून चालवण्यात येतील.
३)कोणताही असा खटला चालवत असताना, विशेष न्यायाधीशास, आरोपीवर, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) अन्वये त्याच खटल्यामध्ये आरोप करता येईल अशा, कलम ३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाखेरीजच्या इतर अपराधांबद्दल खटला चालवता येईल.
१.(४) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये काहीही असले तरी, अपराधाची संपरीक्षा व्यवहार्य असेल तेथवर, दैनदिन पद्धतीने केली जाईल आणि उक्त संपरिक्षा दोन वर्षाच्या आत पूर्ण होईल असे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल :
परंतु, जेथे संपरिक्षा उक्त कालावधीत पूर्ण न झाल्यास, विशेष न्यायाधीश असे न झाल्याची कारणे नोंदवील :
परंतु आणखी असे की, उक्त कालावधी, लिखित स्वरुपात नोंदवल्या जाणाऱ्या कारणास्तवर एकावेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त नाही असा वाढवला जाऊ शकतो, त्यामुळे, तथापि, असा विस्तारित कालावधीसह एकूण कालावधी चार वर्षापेक्षा जास्त नसावा.)
———–
१. सन २०१८ का अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम २ द्वारा पोटकलम (४)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असलेले तरीही, विशेष न्यायाधीश, शक्य तेथवर, अपराधाबाबतचे खटले दैनंदिन तत्त्वावर चालवतील.) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.