भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ३० :
निरसन व व्यावृत्ती :
(१)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९४७ (१९४७ चा २) आणि फौजदारी विधी सुधारणा अधिनियम, १९५२ (१९५२ चा ४६) यांचे याद्वारे निरसन करता येत आहे.
(२) या निरसनामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, परंतु, सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १९८७ (१९८७ चा १०) याचे कलम ६ लागू करण्यात कोणताही बाध न आणता, अशाप्रकारे निरसित केलेल्या अधिनियमाच्या अन्वये किंवा अनुषंगाने केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कार्यवाही किंवा केल्याचे अभिप्रेत असलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही ही, या अधिनियमातील तरतुदींशीची विसंगत नसतील तेथवर, या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींखाली त्याच्या अनुषंगाने केली असल्याचे मानण्यात येईल.