भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २९ :
१९४४ च्या अध्यादेश ३८ ची सुधारणा :
फौजदारी, विधी सुधारणा अध्यादेश, १९४४ यामध्ये
(a)क) अ)कलम ३ चे पोटकलम (१), कलम ९ चे पोटकलम (१), कलम १० चा खंड (अ), कलम ११ चे पोटकलम, (१), कलम १३ चे पोटकलम (१) यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राज्य शासन हे शब्द येत असतील त्या ठिकाणी राज्य शासन किंवा, यथास्थिति, केंद्रशासन हे शब्द दाखल करण्यात येतील.
(b)ख) ब) कलम १० च्या खंड (अ) मध्ये तीन महिने या शब्दांऐवजी एक वर्ष हे शब्द दाखल करण्यात येतील.
(c)ग) (क) अनुसूचीमद्ये;
(एक) परिच्छेद १ वगळण्यात येईल;
(दोन) परिच्छेद २ व ४ मध्ये-
(a)क) अ) स्थानिक प्राधिकरण ३ या शब्दानंतर, केंद्रीय, प्रांतिक किंवा राज्य अधिनियमान्वये स्थापन केलेले महामंडळ किंवा शासनाच्या मालकीचे, त्याच्या नियंत्रणाखाली असलेले किंवा त्याद्वारे अर्थसहाय्य देण्यात येणारे प्राधिकरण किंवा संस्था, किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) याच्या कलम ६१७ मध्ये व्याख्या केलेली शासकीय कंपनी किंवा असे महामंडळ प्राधिकरण, निकाय किंवा शासकीय संस्था यांच्याद्वारे अर्थसहाय्य देण्यात आलेली संस्था हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(b)ख) ब) किंवा प्राधिकरण या शब्दांनंतर किंवा निकाय, शासकीय संस्था किंवा सोसायटी हा मजकूर दाखल करण्यात येईल;
(तीन) ४-अ या परिच्छेदाऐवजी पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येईल :-
४-अ. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ नुसार शिक्षापात्र असलेला अपराध ;
(चार) परिच्छेद ५ मध्ये बाबी २,३ व ४ या मजकुराऐवजी बाबी २,३,४ आणि ४. अ हा मजकुर दाखल करण्यात येईल.