भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ११ :
लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने कोणताही मोबदला न देता १.(अयोग्य फायदा (अनड्यू अॅडव्हेनटेज)) प्राप्त करणे :
लोकसेवक असलेली जी कोणतीही व्यक्ती, जिने कोणतीही कार्यवाही किंवा व्यवहार केला आहे किंवा करण्याच्या स्थितीत आहे अशा कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी ज्या कोणत्याही व्यक्तीचा संबंध होता किंवा आहे किंवा असण्याची शक्यता आहे हे तिला माहित असेल किंवा तिच्या स्वत:च्या किंवा जी ज्यास दुय्यम आहे अशा कोणत्याही लोकसेवकाच्या पदाच्या नात्याने पार पाडावयाच्या २.(पदीय कामे आणि लोक कर्तव्यांशी) जिचा कोणताही प्रकारचा संबंध असेल किंवा अशा संबंधित व्यक्तीशी जिचा कोणताही हितसंबंध असल्याचे किंवा नातेसंबंध असल्याचे तिला माहित असेल, अशा कोणत्याही व्यक्तीकडून, कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा जो पुरेसा नाही हे माहित असूनही अशा प्रकारच्या मोबदल्याप्रीत्यर्थ, स्वत:साठी किंवा कोणत्याही इतर व्यक्तींसाठी कोणताही १.(अयोग्य फायदा (अनड्यू अॅडव्हेनटेज)) स्वीकारील, प्राप्त करील, ३(.***) स्वीकारण्याचे मान्य करील किंवा ) मिळविण्याचा प्रयत्न करील तर ती सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या, परंतु ज्यात पाच वर्षांपर्यंत वाढ करता येईल एवढया मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, तसेच द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
————-
१. सन २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम ५ द्वारा (मुल्यवान वस्तू) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम ५ द्वारा विवक्षित शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम ५ द्वारा विवक्षित शब्द वगळण्यात आले.