राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसल्यास, –
(a)(क) संमुचित शासन याचा अर्थ, केंद्र शासनाने दिलेल्या स्थानबद्धता आदेशाच्या किंवा अशा आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संबंधात केंद्र शासन आणि एखाद्या राज्य शासनाने किंवा एखाद्या राज्य शासनाच्या अधिवस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या स्थानबद्धता आदेशाच्या किंवा अशा आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संबंधात ते राज्य शासन, असा आहे;
(b)(ख) स्थानबद्धता आदेश म्हणजे कलम ३ अन्वये काढण्यात आलेला आदेश असा आहे;
(c)(ग) विदेशी व्यक्ती या शब्दप्रयोगाला विदेशी व्यक्ती अधिनियम, १९४६ (१९४६ चा ३१) यामध्ये जो अर्थ आहे तोच अर्थ राहील;
(d)(घ) व्यक्ती या संज्ञेमध्ये विदेशी व्यक्तीचा समावेश होतो;
(e)(ङ) एखाद्या संघराज्य क्षेत्राच्या संबंधात राज्य शासन याचा अर्थ त्याचा प्रशासक असा आहे.