राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १६ :
सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कृतीस संरक्षण :
या अधिनियमान्वये सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल केंद्र शासनाविरूद्ध किंवा राज्य शासनाविरूद्ध कोणताही दावा किंवा इतर न्यायालयीन कार्यवाही दाखल करता येणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर न्यायालयीन कार्यवाही दाखल करता येणार नाही.
