राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम ९ :
सल्लागार मंडळे स्थापन करणे :
(१) केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य शासन, आवश्यक असेल तेव्हा, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी एक किंवा अधिक सल्लागार मंडळे स्थापन करील.
(२) अशा प्रत्येक मंडळावर तीन व्यक्ती असतील आणि त्या एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश असतील किंवा न्यायाधीश म्हणून राहिलेल्या असतील किंवा न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाण्यास पात्र असतील आणि अशा व्यक्तींची नेमणूक समुचित शासनाकडून केली जाईल.
(३) सल्लागार मंडळाच्या सदस्यांपैकी जो सदस्य उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे किंवा होता अशा एका सदस्याची समुचित शासन त्या मंडळाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करील आणि एखाद्या संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत, एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असलेल्या कोणत्याही व्यक्तीची सल्लागार मंडळावरील नियुक्ती ही संबंधित राज्य शासनाच्या पूर्ण मान्यतेने केली जाईल.