राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम ५-क :
१.(स्थानबद्धतेची कारणे वेगवेगळी असणे :
ज्यावेळी कलम ३ अन्वये दोन किंवा अधिक कारणांनी काढण्यात आलेल्या स्थानबद्धता आदेशान्वये – मग तो राष्ट्रीय सुरक्षा (दुसरे विशोधन) अधिनियम,१९८४ याच्या प्रारंभापूर्वी काढण्यात आलेला असो किंवा नंतर काढण्यात आलेला असो – एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल त्यावेळी, असा स्थानबद्धता आदेश अशा कारणांपैकी प्रत्येक कारणासाठी स्वतंत्ररीत्या काढण्यात आला आहे असे समजण्यात येईल आणि त्यानुसार –
(a)(क) असा आदेश हा केवळ एखादे कारण किंवा काही कारणे,
(एक) मोघम असल्यामुळे,
(दोन) अस्तित्वात नसल्यामुळे,
(तीन) संबद्ध नसल्यामुळे,
(चार) अशा व्यक्तीशी संबंधित किंवा निकट संबंधित नसल्यामुळे, किंवा
(पाच) अन्य कोणत्याही कारणास्तव विधिअग्राह्य असल्यामुळे,
विधिबाह्य किंवा अप्रवर्ती असल्याचे मानण्यात येणार नाही, आणि म्हणून असा आदेश देणारे शासन किंवा अधिकारी यांची कलम ३ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, उरलेल्या कारणाच्या किंवा कारणांच्या संबंधात खात्री पटली असेल आणि त्यानंतर स्थानबद्धता आदेश दिला असेल असे गृहीत धरता येणे शक्य नाही.
(b)(ख) असा आदेश देणारे शासन किंवा अधिकारी यांची उरलेल्या कारणाच्या किंवा कारणांच्या संबंधात त्या कलमात तरतूद केल्याप्रमाणे खात्री पटल्यानंतरच त्यांनी उक्त कलमान्वये स्थानबद्धता आदेश दिला असल्याचे मानण्यात येईल.
——–
१. १९८४ चा अधिनियम, ६० कलम २ अन्वये कलम ५-क हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले.