राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १० :
सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठवणे :
या अधिनियमामध्ये अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, या अधिनियमान्वये स्थानबद्धता आदेश काढण्यात आलेला आहे अशा प्रत्येक प्रकरणात, समुचित शासन, या आदेशान्वये केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या स्थानबद्धतेच्या दिनांकापासून तीन आठवड्यांच्या आत, ज्या कारणांच्या आधारे तो आदेश काढण्यात आला ती कारणे आणि ज्या व्यक्तीवर त्या आदेशाचा परिणाम झालेला आहे, त्या व्यक्तीने कोणतेही अभिवेदन केले असल्यास ते अभिवेदन, त्याने कलम ९ अन्वये स्थापन केलेल्या सल्लागार मंडळासमोर ठेवील, आणि कलम ३ च्या पोटकलम (३) मध्ये उल्लेखिलेल्या एखाद्या अधिकाऱ्याने आदेश काढला असेल त्याप्रकरणी अशा अधिकाऱ्याने त्या कलमाच्या पोटकलम (४) अन्वये तयार केलेला अहवालही त्या मंडळापुढे ठेवील.