बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६ :
ज्या व्यक्तीने अपराध केला, त्यावेळेस त्याचे वय अठरा (१८) वर्षापेक्षा कमी असताना, त्या व्यक्तीचे स्थान :
१) एखाद्या व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर, त्याने १८ वर्षे वय होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी पकडले गेल्यास, सदर व्यक्तीस या कलमातील तरतुदीनुसार चौकशीच्या कारवाईत बालकच समजले जाईल.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीस जर जामिनावर मुक्त केले गेले नसल्यास, त्या व्यक्तीस चौकशीच्या दरम्यान सुरक्षित ठिकाणी ठेवले जावे.
३) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीस या अधिनियमातील तरतुदीनुसारच कारवाई केली जाईल.