बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५ :
अशा व्यक्तीचे स्थान, जो चौकशीच्या दरम्यान व्याख्येनुसार बालक (मुल) रहात नाही :
या अधिनियमान्वये ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशा व्यक्तीने चौकशीच्या काळातच वयाची १८ वर्षे पूर्ण केली तर, या अधिनियमात किंवा त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, मंडळामार्फत सुरु असणारी चौकशी पूर्ण केली जाईल आणि सदर व्यक्ती बालक असती तर त्याबाबत जसे आदेश दिले गेले असते तसे आदेश मंडळाकडून दिले जातील.