JJ act 2015 कलम ४४ : पालन पोषण (उसने संगोपन) संबंधी देखभाल (फॉस्टर केअर) :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ४४ :
पालन पोषण (उसने संगोपन) संबंधी देखभाल (फॉस्टर केअर) :
१) संगोपन आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांना उसन्या संगोपनासाठी (पोषण देखरेख) व सामुदायिक उसन्या संगोपनासाठी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करुन बाल कल्याण समितीच्या सूचनेप्रमाणे जन्मदाते मातापिता किंवा पालक ज्या कुटूंबाचा भाग नाहीत अशा कुटूंबात किंवा सर्वस्वी भिन्न मात्र उसन्या संगोपनास (पोषण देखरेख) राज्य सरकारकडून योग्य ठरविलेल्या कुटूंबात काही काळासाठी किंवा दिर्घ काळासाठी ठेवता येईल.
२) उसन्या संगोपनासाठीच्या (पोषण देखरेख) कुटूंबाची निवड कुटूंबाची क्षमता, हेतू, मर्यादा आणि बालकांच्या संगोपनाच्या पूर्वानुभव यावरुन केली जाईल.
३) त्यांच्या भल्यासाठी विभक्त ठेवण्याची आवश्यकता नसल्यास भावंडांना शक्यतोवर एकाच कुटूंबात उसन्या संगोपनासाठी (पोषण देखरेख) ठेवले जाईल.
४) राज्य सरकार, ठराविक कार्यपद्धतीनुसार बालकाच्या योग्य संगोपनासाठी आवश्यक तपासणीची तजवीज करुन संगोपनासाठी दिलेल्या बालकांची संख्या विचारात घेऊन जिल्हा बाल संरक्षण केन्द्रामार्फत मासिक तत्वावर निधी पुरवेल.
५) ज्या प्रकरणात बालकाचे मातापिता बालकाचे संगोपन करण्यास अपात्र किंवा असमर्थ असतील, असल्याचे बाल कल्याण समितीस आढळले असेल म्हणून बालकास उसन्या संगोपनात (पोषण देखरेख) ठेवलेले असेल त्या प्रकरणात समितीला अशा भेटी बालकाच्या दृष्टीने योग्य नाहीत, असे वाटत नाहीत, असे वाटत नसल्यास बालकाचे मातापिता बालकाला उसन्या संगोपनाच्या (पोषण देखरेख) ठिकाणी जाऊन नियमितपणे भेटू शकतील, जर अशा भेटी बालकाच्या दृष्टीने योग्य नाहीत असे समितीचे मत असल्यास त्याबाबत कारणांसह लेखी स्वरुपात नोंद केली पाहिजे आणि जेव्हा मातापिता बालकाचे योग्यरित्या संगोपन करु शकतील असे समितीला आढळल्यास त्यावेळी उसन्या संगोपनावरुन (पोषण देखरेख) बालक मातापित्यांकडे परतू शकेल.
६) उसन्या संगोपनातील कुटूंबावर बालकाच्या शिक्षण, आरोग्य आणि पालनपोेषणाची जबाबदारी असेल आणि सदर उसने कुटूंब बालकाच्या संगोपनाची दिलेल्या सूचनांप्रमाणे काळजी घेईल.
७) बालकांना कोणत्या पद्धतीने उसने संगोपन पुरविले जाईल याची क्रियारीती, पात्रता निकष आणि पद्धत ठरविण्यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करु शकेल.
८) समिती ठराविक पद्धतीने, उसन्या संगोपनात दिलेल्या बालकांच्या संगोपनाबाबत दरमहा उसन्या कुटूंबाची तपासणी करील, जर बालकाच्या संगोपनात काही कमतरता आढळल्यास बालकास सदर उसन्या कुटूंबात काढून घेऊन दुसऱ्या कुटूंबात पाठविले जाईल.
९) दत्तक देण्यास योग्य असलेल्या कोणत्याही बालकास दिर्घ काळासाठी उसन्या संगोपनात दिले जाणार नाही.

Leave a Reply