JJ act 2015 कलम २६ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या व पलायन केलेल्या बालकाबाबत तरतूद :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २६ :
कायद्याचे उल्लंघन केलेल्या व पलायन केलेल्या बालकाबाबत तरतूद :
१) त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कायद्याच्या विरुद्ध वागत असलेल्या आणि या अधिनियमानुसार त्याला सोपविण्यात आलेल्या कोणत्याही विशेष अभिगृहातून किंवा निरीक्षण केन्द्रातून किंवा सुरक्षागृहातून किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या अभिरक्षेतून पलायन केलेल्या कोणत्याही बालकास, कोणताही पोलीस अधिकारी ताब्यात घेऊ शकेल.
२) पोटकलम (१) मध्ये नमूद करण्यात आलेल्या व ताब्यात घेतलेल्या बालकास, ताब्यात घेतल्यापासून २४ तासाच्या आत, ज्या मंडळाने त्या बालकाच्या संबंधात मूळ आदेश पारित केलेला असेल, त्या मंडळासमोर किंवा तसे शक्य नसल्यास जेथे सदर बालक सापडला असेल, त्याच्या नजीकच्या मंडळासमक्ष हजर केले जाईल.
३) सदर मंडळ बालकाच्या पलायनाच्या कारणांची पडताळणी करुन, मंडळास योग्य वाटेल, त्याप्रमाणे त्या बालकास, ज्या विशेष अभिगृहातून किंवा संस्थेतून किंवा व्यक्तीच्या अभिरक्षेतून त्याने पलायन केलेले असेल, त्या अभिगृह किंवा संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या किंवा तत्सम इतर अभिगृह किंवा संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या ताब्यात सोपवतील :
परंतु सदर मंडळ सदर बालकाच्या बाबतीत योग्य असतील अशी आणखीही कार्यवाही करण्याबाबत आदेश पारीत करु शकेल.
४) अशा बालकाच्या बाबतीत याव्यतिरिक्त इतर काहीही कार्यवाही केली जाणार नाही.

Leave a Reply