बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २४ :
अपराधाच्या तपसातील पुराव्यांच्या आधारे अपात्रता दूर करणे :
१) त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात अपात्रतेबाबत काहीही नमूद असले तरी, ज्या बालकाने अपराध केला आहे आणि या अधिनियमाच्या तरतुदींनुसार त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे, अशा बालकास अपात्र ठरविले जाणार नाही :
परंतु ज्या बालकाने वयाची १६ वर्षे पूर्ण केलेली आहेत किंवा जो बालक १६ वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचा निर्णय बाल न्यायालयाने कलम १९ च्या पोटकलम (१) च्या खंड (एक) अन्वये दिलेला असेल त्या हे पोटकलम (१) लागू होणार नाही.
२) अपीलाचा कालावधी उलटून गेल्यानंतर किंवा पूर्वी ठरविलेली विवक्षित मुदत उलटून गेल्यावर, यथास्थिती, मंडळ पोलिसांना किंवा बाल न्यायालय, न्यायालय अधिष्ठता यांना, सदर दोषसिद्धीचा अभिलेख नष्ट करण्याबाबत आदेश देतील :
परंतु जर अपराध निर्घृण स्वरुपाचा असल्यास आणि सदर बालक कायद्याचे उल्लंघन केल्याचा निर्णय बाल न्यायालयाने कलम १९ च्या पोटकलम (१) च्या खंड (एक) अन्वये दिलेला असेल तर बाल न्यायालय सदर अभिलेख राखून ठेवील.