बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २० :
ज्या बालकाने वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत मात्र सुरक्षा गृहातील वास्तव्याचा विहित कालावधी पूर्ण केला नसल्यास :
१) जेव्हा कायद्याचे उल्लंघन केलेले बालक वयाची २१ वर्षे पूर्ण करेल, पण त्याचा सुरक्षागृहातील वास्तव्याचा कालावधी पूर्ण झालेला नसल्यास, बाल न्यायालय, परिवीक्षा अधिकारी किंवा जिल्हा बाल सुरक्षा केन्द्र किंवा सामाजिक कार्यकर्ता किंवा स्वत: पाठपुरावा करुन बालकात सुधारणात्मक बदल घडून आलेले असल्याबाबत आणि सदर बालक समाजात योगदान देणारी घटक म्हणून राहण्यायोग्य झाले असल्याबाबत खात्री करुन घेईल व त्यासाठी कलम १९ च्या पोटकलम (४) अन्वये सादर झालेले अहवाल आणि संबंधित तज्ञांचा अभिप्राय विचारात घेईल.
२) पोटकलम (१) मध्ये नमूद क्रियारीती पूर्ण केल्यानंतर आवश्यक असल्यास बाल न्यायालय,-
एक) वास्तव्याच्या उर्वरित कालावधीसाठी नियंत्रण अधिकाऱ्याची नेमणूक करणे किंवा न्यायालयास योग्य वाटतील अशा अटींवर बालकाची मुक्तता करण्याचा विनिश्चय करु शकेल;
दोन) बालक आदेशातील उर्वरित कालावधी कारागृहात जाऊन पूर्ण करेल, अशा आशयाचा आदेशाचा विनिश्चय करु शकेल:
परंतु प्रत्येक राज्य सरकार नियंत्रण अधिकाऱ्यांची यादी तयार करतील आणि नियंत्रणाची ठरवून देईल.