माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३४ :
प्रकटन :
१) प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने-
(a)क)अ)१. (***) त्याचे इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र;
(b)ख)ब) त्याच्याशी संबंधित असे प्रमाणन प्रॅक्टिस (प्रथा) विवरणपत्र;
(c)ग) क) त्याचे प्रमाणन प्राधिकरण प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची किंवा त्याच्या निलंबनाची नोटीस असल्यास; आणि
(d)घ) ड) त्या प्राधिकरणाने जे दिले असेल अशा डिजिटल सही प्रमाणपत्राच्या विश्वासार्हतेवर किंवा त्या प्राधिकरणाच्या सेवा पार पाडण्याच्या क्षमतेवर महत्त्वाचा आणि विपरीत परिणाम करीत असतील अशी इतर तथ्ये,
प्रकट करील.
२) प्रमाणन प्राधिकरणाच्या मते त्याच्या संगणक यंत्रणेच्या सच्चेपणावर किंवा ज्या शर्तीस अधीन राहून २.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्यात आले असेल त्यावर महत्त्वपूर्ण व प्रतिकूल परिणाम करील अशी कोणतीही घटना घडली आहे किंवा परिस्थिती उद्भवली आहे तर, प्रमाणन प्राधिकरणाने
(a)क)अ) त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अधिसूचित करण्यासाठी वाजवी प्रयत्न केले पाहिजेत, किंवा
(b)ख)ब) अशा प्रसंगी किंवा अशा बाबतीत कार्यवाही करण्यासाठी त्याच्या प्रमाणन प्रॅक्टिस विवरणपत्रामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कार्यपद्धतीनुसार कृती केली पाहिजे.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १६ द्वारे गाळले.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.
