IT Act 2000 कलम ४३क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ४३क :
१.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती :
आपल्या मालकीच्या, नियंत्रणातील किंवा कार्यचालनातील संगणक यंत्रणेमध्ये कोणताही संवेदनशील डाटा किंवा माहिती धारण करणाऱ्या त्याची देवाणघेवाण करणाऱ्या किंवा ती हाताळणाऱ्या निगम निकालाने, वाजवी सुरक्षा प्रथा व कार्यपद्धती यांची अंमलबजावणी करण्यात व ठेवण्यात निष्काळजीपणा केला असेल आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस अन्याय तोटा किंवा अन्याय्य फायदा झाला असेल त्याबाबतीत असा निगम, निकाय, अशा प्रकारे बाधा पोहोचलेल्या व्यक्तीस, पाच कोटीपेक्षा अधिक नसेल इतकी रक्कम, नुकसानभरपाईच्या रूपाने हानिपूर्ती करण्यास पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ-
एक) निगम, निकाय याचा अर्थ कोणतीही कंपनी, असा आहे आणि भागीदारी संस्था, एका व्यक्तीची मालकी असलेली संस्था किंवा वाणिज्य अथवा व्यावसायिक कार्य करणारा अन्य व्यक्तींचा संघ, यांचा समावेश होतो;
दोन) वाजवी सुरक्षापद्धती व कार्यपद्धती याचा अर्थ अनधिकृत शिरकाव करणे, नुकसान करणे, वापर करणे फेरबदल करणे, उघड करणे किंवा बिघाड करणे यापासून अशा माहितीचे संरक्षण करण्यासाठी दोन्ही पक्षकारांमध्ये झालेल्या करारमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा सुरक्षापद्धती व कार्यपद्धती अथवा, अशा कोणत्याही कराराच्या किंवा कायद्याच्या अभावी, केंद्र सरकार, त्याला योग्य वाटले अशा व्यावसायिक संस्थांशी किंवा अधिसंघांशी विचारविनिमय करून विहित करील अशा वाजवी सुरक्षापद्धती व कार्यपद्धती असा आहे.
तीन) संवेदनक्षम वैयक्तिक डाटा (आधार सामग्री) किंवा माहिती याचा अर्थ केंद्र सरकार त्याला योग्य वाटेल अशा व्यावसायिक संस्थांशीकिंवा अधिसंघांशी विचारविनिमय करून विहित करील अशी वैयक्तिक माहिती, असा आहे;
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २२ द्वारे दाखल केले.

Leave a Reply