IT Act 2000 कलम ३० : प्रमाणन प्राधिकरणाने विवक्षित-कार्यपद्धतीचा अवलंब करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३० :
प्रमाणन प्राधिकरणाने विवक्षित-कार्यपद्धतीचा अवलंब करणे :
प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण,
(a)क)(अ) भेदणे (इन्स्ट्रूजन) आणि गैरवापर यापासून सुरक्षित केल्या असतील अशाच हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कार्यपद्धतीचा वापर करील.
(b)ख)(ब) उद्देशित कार्ये पार पाडण्याशी वाजविरीत्या अनुरूप असतील अशा सेवा विश्वासार्हतेच्या वाजवी पातळीवर पुरवील;
(c)ग) (क)१.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची) गुप्तता आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा कार्यपद्धतीच अनुसरील;२.(***)
(ca)३.(गक)(कअ) या अधिनियमान्वये दिलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रांचे संग्रहस्थान असेल.
(cb)गख)(कब) त्याच्या पद्धती (प्रथा) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रे व अशा प्रमाणपत्राची सद्य:स्थिती यासंबंधीची माहिती प्रसिद्ध करील; आणि
(d)घ)(ड) विनियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आली असतील अशा इतर मानकांचे पालन करील.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १५ द्वारे गाळले.
३.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १५ द्वारे दाखल.

Leave a Reply