माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २६ :
लायसेन्स निलंबित करण्याची किंवा रद्द करण्याची नोटीस :
१) प्रमाणन प्राधिकरणाचे लायसेन्स निलंबित किंवा रद्द करण्यात आले असेल अशा बाबतीत, नियंत्रक अशा विलंबनाची किंवा, यथास्थिती, रद्द करण्याबाबतची नोटीस त्याने ठेवलेल्या माहिती साठ्यात प्रसिद्ध करील.
२) अशी एक किंवा अधिक संग्रहस्थाने विनिर्दिष्ट करण्यात आली असतील अशा बाबतीत, नियंत्रक अशा निलंबनाच्या किंवा रद्द करण्याच्या नोटिसा अशा सर्व संग्रहस्थानामध्ये प्रसिद्ध करील.
परंतु, अशा निलंबनाच्या किंवा, यथास्थिती, रद्द करण्याच्या नोटिशीचा अंतर्भाव असलेला माहितीसाठी वेबसाईटद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल व तो चोवीस तास उपलब्ध असेल.
परंतु आणकी असे की, नियंत्रक, त्याला तसे करणे योग्य वाटले तर, अशी माहिती साठ्यामधील मजकूर त्याला योग्य वाटेल अशा इलेक्ट्रॉनिक किंवा इतर माध्यमांतून प्रसिद्ध करील.