IT Act 2000 कलम २१ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्याचे लायसेन्स :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २१ :
१.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्याचे लायसेन्स :
१) पोटकलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून कोणतीही व्यक्ती, १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्याच्या लायसेन्ससाठी नियंत्रकाकडे अर्ज करू शकेल.
२) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्यासाठीची अर्हता, अनुभव, मनुष्यबळ, आर्थिक साधनसामग्री आणि इतर मूलभूत सुविधा याबाबतीत केंद्र शासनाकडून प्रमाणित करण्यात आल्या असतील अशा आवश्यकता अर्जदाराने पूर्ण केल्या नाही तर, पोटकलम (१) अन्वये कोणतेही लायसेन्स देण्यात येणार नाही.
३) या कलमान्यवये देण्यात आलेले लायसेन्स –
(a)क)अ) केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा कालावधीसाठी वैध असेल;
(b)ख)ब) हस्तांतरणीय किंवा वारसाप्राप्त असणार नाही;
(c)ग) क) विनियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा अटी व शर्तीना अधीन असेल.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.

Leave a Reply