IT Act 2000 कलम १२ : पोचपावती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १२ :
पोचपावती :
१) ओरिजिनेटरने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची पोचपावती एखाद्या विशिष्ट स्वरूपात किंवा विशिष्ट रीतीने देण्यात येईल याबाबत १.(करारनिविष्ट केले नसेल) अशा बाबतीत-
(a)क)(अ) प्रेषितीला स्वयंचलित किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही संदेशाद्वारे; किंवा
(b)ख)(ब) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पोहोचले आहे हे ओरिजिनेटरला पुरेसे सूचित केले जाईल, अशा प्रकारच्या प्रेषितीच्या कोणत्याही वर्तणुकीद्वारे
पोच देता येईल.
२) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची पोच ओरिजिनेटरला मिळाल्यानंतरच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बंधनकारक असेल अशी अट ओरिजिनेटरने घातली असेल तर अशाप्रकारे पोच मिळेपर्यंत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ओरिजिनेटरने पाठवले नसल्याचे मानण्यात येईल.
३) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड फक्त अशी पोच मिळाल्यानंतरच बंधनकारक असेल अशी अट ओरिजिनेटरने घातली नेसल आणि विनिर्दिष्ट केलेल्या किंवा मान्य केलेल्या वेळेत किंवा जर अशी वेळ विनिर्दिष्ट केली नसेल किंवा मान्य केली नसेल तर वाजवी वेळेत अशी पोच मिळाली नसेल तर आपल्याला पोच मिळालेली नाही किंवा वाजवी कालावधी विनिर्दिष्ट करून त्या कालावधीत आपल्याला पोच मिळालीच पाहिजे व अशी पोच उपरोक्त कालावधीत न मिळाल्यास तो प्रेषितीला नोटीस देऊन ते इलेक्ट्रॉनिक अभिलेख त्याने पाठवलेच नव्हते असे मानील अशी नोटीस ओरिजिनेटर प्रेषितीला देऊ शकेल.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १० द्वारे सुधारणा.

Leave a Reply