Ipc कलम ८४ : मनोविकल व्यक्तीची कृती :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ८४ :
मनोविकल व्यक्तीची कृती :
(See section 22 of BNS 2023)
जी व्यक्ती एखादी कृती करण्याच्यावेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर किंवा कायद्याच्या विरूध्द आहे, हे जाणण्यास ती मनोविकलतेमुळे किंवा वेडेपणामुळे असमर्थ असेल, तर त्या व्यक्तीने केलेली कोणताही कृती अपराध होत नाही.

Leave a Reply