भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५४ :
एखादे नाणे अस्सल म्हणून सुपूर्द (स्वाधीन ) करणे, ते नाणे पहिल्यांदा (प्रथम) कब्जात आले तेव्हा त्यात बदल करण्यात आल्याचे सुपूर्द (स्वाधीन) करणाऱ्यास माहीत नसल्यास :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखादे नाणे अस्सल म्हणून दुसऱ्या व्यक्तीला सुपूर्द करणे – ते नाणे पहिल्यांदा कब्जात आले तेव्हा त्यात बदल करण्यात आल्याचे सुपूर्दकाराला माहीत नसल्यास.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा नाण्याच्या मूल्याच्या दहापट पर्यंत द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
ज्या नाण्याबाबत कलम २४६, २४७, २४८ अगर कलम २४९ मध्ये उल्लेखिलेली (वर्णन) केलेली अशी कोणतीही क्रिया करण्यात आलेली असल्याचे स्वत:ला माहीत आहे, पण जे आपल्या कब्जात घेतले तेव्हा तशी क्रिया केली होती हे स्वत:ला माहीत नव्हते असे कोणतेही नाणे जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीकडे (इसमास) अस्सल म्हणून अगर ते जसे आहे त्याहून निराळ्या वर्णनाचे नाणे म्हणून सुपूर्द (हवाली) करील अथवा स्वाधीन करील अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीस ते खरे म्हणून किंवा ते जसे आहे त्याहून निराळ्या प्रकारचे नाणे म्हणून स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करील तर त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा बदललेले नाणे ज्याच्या बदली खपवण्यात आले किंवा खपविण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या नाण्याच्या मूल्याच्या दहा पटीपर्यंत असू शकेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.