Ipc कलम २२९-अ : जामिनावर किंवा बंधपत्रावर सोडलेल्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहण्यास कसूर करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२९-अ :
१.(जामिनावर किंवा बंधपत्रावर सोडलेल्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहण्यास कसूर करणे :
(See section 269 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जामिनावर किंवा जातमुचलक्यावर सोडलेल्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहण्यास कसूर करणे.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी, दोषारोप करण्यात आला असताना आणि प्रतिभूती विना जामिनावर किंवा बंधपत्रावर सोडले असताना, पुरेसे कारण नसताना (हे सिध्द करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल) जामिनाच्या किंवा बंधपत्राच्या शर्तींना अनुसरून न्यायालयात उपस्थित राहण्यात कसूर करील, त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची, एक वर्षपर्यंत असू शकेल अशा मुदतीची शिक्षा, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्हीही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
या कलमाखालील शिक्षा ही,–
अ)अपराध्यावर ज्या अपराधाचा आरोप ठेवण्यात आला असेल तो सिध्द झाल्यावर त्याला जी शिक्षा होईल. त्या व्यतिरिक्त; आणि
ब)बंधपत्र समपहृत करण्याचा आदेश देण्याच्या न्यायालयाच्या अधिकारास बाधा न आणणारी, असेल.)
——–
१. सन २००५ या फौजदारी प्रक्रिया संहिता (सुधारणा) अधिनियम, २००५(२००५ चा २५)कलम ४४(क) द्वारे घातले (२३.६.२००६ पासून).

Leave a Reply