Ipc कलम २२५-अ : ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात, लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे टाळणे किंवा पळून जाऊ देणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२५-अ :
१.(ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात, लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे टाळणे किंवा पळून जाऊ देणे :
(See section 264 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यांच्यांसाठी अन्यथा उपबंध केलेला नाही अशा प्रकरणांत, लोकसेवकाने गिरफददारी करण्याचे टाळणे किंवा पडून जाऊ देणे :
क) उद्देशपूर्वक गिरफदारी करण्याचे टाळल्यास किंवा पलायन होऊ दिल्यास.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
अपराध : ख) हयगयीने गिरफदारी करण्याचे टाळल्यास किंवा पलायन होऊ दिल्यास.
शिक्षा :२ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
———
जो कोणी लोकसेवक असून, कलम २२१, कलम २२२ किंवा कलम २२३ यामध्ये किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये ज्यासाठी उपबंध (तरतूद) करण्यात आलेला नाही, अशा कोणत्याही प्रकरणामध्ये, एखाद्या व्यक्तीला गिरफदार (अटक) करण्यास किंवा बंदिवासात ठेवण्यास तो असा लोकसेवक म्हणून विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असताना त्या व्यक्तीला गिरफदार (अटक) करण्याचे टाळील किंवा तिला बंदिवासातून पळून जाऊ देईल त्याला –
अ)जर त्याने तसे उद्देशपूर्वक केले असेल तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील; आणि
ब)जर त्याने तसे हयगयीने केले असेल तर, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
——-
१. १८८६ चा अधिनियम १० – कलम २४(१) द्वारे कलम २२५ क ऐवजी कलमे २२५क व २२५ख ही दाखल करण्यात आली. मूळ कलम २२५क हे १८७० चा अधिनियम २७ – कलम ९ द्वारे समाविष्ट करण्यात आले होते.

Leave a Reply