भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२१ :
गिरफदार (अटक) करण्यास बद्ध असलेल्या (बांधलेल्या) लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे :
(See section 259 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध्याला गिरफदार करण्यास विधित: बद्ध असलेल्या लोकसेवकाने गिरफदारी करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे – अपराध देहांतदंड्य असल्यास.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास द्रव्यदंडासह किंवा त्याविना .
दखलपात्र / अदखलपात्र :ज्या अपराधासंबंधात अशी अकृती करण्यात आली असेल तो दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
अपराध : आजीवन कारावासाच्या किंवा १० वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास, द्रव्यदंडासह किंवा त्याविना .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
अपराध : १० वर्षाहून कमी कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, द्रव्यदंडासह किंवा त्याविना .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जी कोणी लोकसेवक असून, एखाद्या अपराधाचा दोषारोप असलेल्या किंवा त्याबद्दल गिरफदार (अटक) होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला गिरफदार (अटक) करण्यास किंवा बंदिवासात ठेवण्यास असा लोकसेवक म्हणून तो विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असताना, अशा व्यक्तीला गिरफदार (अटक) करण्याचे उद्देशपूर्वक टाळील अगर उद्देशपूर्वक अशा व्यक्तीला पळून जाऊ देईल, अगर उद्देशपूर्वक अशा व्यक्तीला बंदिवासातून पळून जाण्याचा प्रयत्न करण्याच्या कामी मदत करील तर त्याला पुढीलप्रमाणे शिक्षा होईल.
म्हणजे –
जर बंदिवासातील व्यक्तीवर किंवा जिला गिरफदार (अटक) करावयास हवे होते अशा व्यक्तीवर मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचा दोषारोप असेल किंवा तशा अपराधाबद्दल गिरफदार (अटक) होण्यास ती पात्र असेल तर, त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा द्रव्यदंडासहित किंवा त्याविना होईल; किंवा
जर बंदिवासातील व्यक्तीवर किंवा जिला गिरफदार (अटक) करावयास हवे होते अशा व्यक्तीवर १.(आजन्म कारावासाच्या) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचा दोषारोप असेल किंवा तशा अपराधाबद्दल गिरफदार (अटक) होण्यास ती पात्र असेल तर त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, द्रव्यदंडासहित किंवा त्याविना, होईल; किंवा
जर बंदिवासातील व्यक्तीवर किंवा जिला गिरफदार (अटक) करावयास हवे होते अशा व्यक्तीवर दहा वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचा दोषारोप असेल तर, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, द्रव्यदंडासहित किंवा त्याविना होईल.
——–
१. १९५६ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप / काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.