Ipc कलम १९७ : खोटे प्रमाणपत्र देणे किंवा स्वाक्षरित करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १९७ :
खोटे प्रमाणपत्र देणे किंवा स्वाक्षरित करणे :
(See section 234 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या तथ्याबद्दल जशा प्रकारचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून स्वीकार्य असते तशा प्रकारचे खोटे प्रमाणपत्र समजूनसवरुन देणे किंवा स्वाक्षरित करणे.
शिक्षा :खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा रचण्याबद्दल असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :खोटा पुरावा देण्याचा अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———-
जे प्रमाणपत्र देणे किंवा स्वाक्षरित करणे विधित: (कायद्याने) आवश्यक अथवा जे एखाद्या तथ्याबद्दल पुरावा म्हणून स्वीकार्य असल्याने त्याच्याशी संबंधित आहे असे कोणतेही प्रमाणपत्र, जे एखाद्या महत्वाच्या मुद्दयाबाबत खोटे आहे हे स्वत:ला माहीत असताना किंवा तसे स्वत: समजत असताना, जो कोणी देईल अगर स्वाक्षरित करील त्याला, जणू काही त्याने खोटा पुरावा दिलेला आहे त्याप्रमाणे त्याच रीतीने शिक्षा होईल.

Leave a Reply