Ipc कलम २५६ : शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५६ :
शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे :
(See section 181 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) शासनाद्वारे पुर:सृत (काढलेला) असा कोणताही मुद्रांक नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन किंवा सामग्री वापरण्याच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) अथवा तसा वापर होण्याचे उद्देशित आहे हे माहीत असून किंवा तसे समजण्यास कारण असून जो कोणी ते कब्जात बाळगील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply