Ipc कलम १८७ : लोकसेवकास सहाय्य देणे विधित: (कायद्याने) बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १८७ :
लोकसेवकास सहाय्य देणे विधित: (कायद्याने) बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे:
(See section 222 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोक सेवकाला साह्य देणे विधित: बंधनकारक असताना असे साह्य देण्याचे टाळणे.
शिक्षा :१ महिन्याचा साधा कारावास किंवा २०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———–
अपराध : आदेशिकेची अंमलबजावणी, अपराधांस प्रतिबंध, इत्यादी कामात मदत मागणाऱ्या लोकसेवकाला मददत करण्याबाबत बुद्धिपुरस्सर दुर्लक्ष करणे.
शिक्षा :६ महिन्याचा साधा कारावास किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———-
कोणत्याही लोकसेवकाला त्याचे सार्वजनिक कर्तव्य बजाविण्याच्या कामी सहाय्य करण्यास किंवा पुरविण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बंधनकारक) असताना जो कोणी सहाय्य देण्याचे उद्देशपूर्वक टाळील त्याला, एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाची कारावासाची शिक्षा, किंवा दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
आणि जर न्यायालयाने कायदेशीरपणे काढलेल्या कोणत्याही आदेशिकेची अमंलबजावणी करण्याकामी अथवा अपराध घडण्यास प्रतिबंध करणे अथवा दंगा किंवा दंगल शमविणेकामी अथवा अपराध केल्याचा दोषारोप असलेल्या अगर त्याबद्दल किंवा कायदेशीर हवालतीमधून पळून गेल्याबद्दल दोषी असलेल्या व्यक्तीला गिरफदार करण्याच्या प्रयोजनार्थ सहाय्य मागण्यास विधित: (कायद्याने) सक्षम असलेल्या लोकसेवकाने त्याच्याकडे असे सहाय्य मागितले असता उद्देशपूर्वक टाळील तर, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply