Ipc कलम १४९ : समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक (सभासद) दोषी असणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १४९ :
समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक (सभासद) दोषी असणे:
(See section 190 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जर बेकायदेशीर जमावातील कोणत्याही घटक व्यक्तीने अपराध केला तर अशा जमावातील अन्य प्रत्येक घटक व्यक्ती अपराधाबद्दल दोषी होईल.
शिक्षा :अपराधाला असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र :अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———–
बेकायदेशीर जमावाच्या कोणत्याही घटकाकडून (सभासदाकडून) त्या जमावाचे समान उद्दिष्ट साधण्यासाठी एखादा अपराध किंवा ते उद्दिष्ट साधण्यासाठी जो अपराध घडणे संभवनीय असल्याची त्या जमावातील घटकव्यक्तींना (सभासदांना) जाणीव होती असा एखादा अपराध घडला तर, तो अपराध घडण्याच्या वेळी जी जी व्यक्ती त्या जमावाचा घटक होती अशी प्रत्येक व्यक्ती त्या अपराधाबद्दल दोषी असते.

Leave a Reply