Ipc कलम १२६ : भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १२६ :
भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे :
(See section 154 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लुटमार करणे.
शिक्षा :७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड, आणि काही मालमत्ता जप्त
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
———–
जो कोणी १.(भारत सरकारशी) मैत्रीचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रामध्ये लूटमार करील किंवा लूटमार करण्याची तयारी करेल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंड व अशी लूटमार करताना वापरलेल्या किंवा वापरण्याचे योजलेल्या अथवा अशा लूटमारीत मिळालेल्या कोणत्याही मालमत्ता सरकारजमा करण्यासही पात्र असेल.
———-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीन याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply